ज्येष्ठ नाटककार आणि लेखक व ‘किरवंतकार’ प्रेमानंद गज्वी यांचा जन्म १५ जून १९४७ रोजी झाला. प्रेमानंद गज्वी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं.
नाना पाटेकरांना घेऊन ते व्यावसायिक रंगमंचावर आलं. महाराष्ट्र मंडळाच्या प्रेमामुळं त्याचा प्रयोग आणि ग्रंथप्रकाशन सोहळा लंडनमध्येही झाला. गोवा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमात ते शिकवलं जाऊ लागलं. कोकणीत त्याचा अनुवाद झाला.
पं. वसंत देवांनी ‘किरवंत’चा हिंदी अनुवाद केला. तो ‘समकालीन भारतीय साहित्य’ या साहित्य अकादमीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला नि पुढं दिल्लीच्या श्रीराम सेंटरनं ‘महाब्राह्मण’च्या रूपात हिंदी रंगमंचावर तो सादर केला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या भारत रंगमहोत्सवातही ते सादर झालं व गाजलं.
प्रेमानंद गज्वी यांचे पहिले नाव आनंद गजभिये.. या बद्दल ते म्हणतात.
मुळातच मला कव्वालीचा भारी नाद होता. गावी आमच्या बौद्ध समाजाचं ‘भीमबुद्ध भजनी मंडळ’ होतं. ते गावोगावी भजन गात. अशाच एका गावी कव्वालीचा सामना मी केला होता. सिनेमातील गाण्यांच्या चालीवर शेदीडशे गाणी मी लिहिली आहेत.
प्रेमानंद गज्वी यांची गाजलेली नाटके व एकांकिका: किरवंत, गांधी आणि आंबेडकर, छावणी, जय जय रघुवीर समर्थ, डॅम इट अनू गोरे, तन-माजोरी, देवनवरी, नूर महंमद साठे, शुद्ध बीजापोटी.
ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी हे ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले होते.
Leave a Reply