आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा. अशोक केळकर यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी पुणे येथे झाला. प्रा. अशोक केळकर यांनी आपले शालेय शिक्षण पुणे शहराच्या रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.
व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी तत्वज्ञान आणि इंग्लिश या विषयांची पदवी प्राप्त केली. रॉकफेलर आणि लिली या प्रतिष्ठानांतर्फे अनुक्रमे भाषाविज्ञान आणि तौलनिक साहित्य व समीक्षा यांच्या अभ्यासासाठी त्यांस छात्रवृत्त्या मिळाल्या होत्या.
पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी १९६७-८९ दरम्यान भाषाशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. त्या कॉलेजातील ’सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी इन लिंग्विस्टिक्स’चे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ अॅन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी. केली.
प्रा. अशोक केळकर यांचे १९ सप्टेंबर २०१४ रोजी निधन झाले.
Leave a Reply