संगीततज्ञ गुरुवर्य प्रा.मा.बा. र. देवधर यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी झाला.
गुरुवर्य देवधर मास्तर ह्यांचे प्राथमिक शिक्षण मिरज येथे आणि त्या नंतरचे शालेय शिक्षण गिरगाव मुंबई येथील आर्यन एज्युकेशन ह्या शाळेत झाले . तदनंतर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेज मध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र ह्या विषयांमध्ये झाले .
वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्यांनी पं निळकंठबुवा जंगम ह्यांच्याकडे संगीत शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यानंतर सन १९१८ पासून त्यांनी गायनाचार्य पं विष्णू दिगम्बर पलुस्कर ह्यांच्याकडे संगीत शिक्षण घेण्यास प्रारंभ केला . पं विष्णू दिगम्बर पलुस्कर ह्यांनी हिंदुस्थानी संगीताच्या प्रचार प्रसाराचे कार्य हाती घेतले होते आणि त्या कामी त्यांचे शिष्य सुद्धा त्यांना मदत करत होते.
बनारस आणि वनस्थळी विश्ववं विद्यालयात कला विभागाचे अधिष्ठाता पद भूषविले. मुंबई विश्ववं विद्यालयात संगीत विभागाच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार त्यांनी रागबोध नावाचे ६ भाग प्रकाशित केले … गायनाचार्य पं विष्णू दिगम्बर पलुस्कर ह्यांचे चरित्र तसेच थोर संगीतकार आणि थोर संगीतकारांची परंपरा ह्या तीन पुस्तकांचे लिखाणही केले.
अजून एक त्यांची विशेष ओळख म्हणजे पं कुमार गंधर्व ह्या महान गायकाचे ते गुरु …जवळ जवळ १२ वर्ष आपल्या जवळ ठेवून त्यांनी आपल्या ह्या शिष्याला घडवले.
प्रा. बा. र. देवधर यांचे १० मार्च १९९० रोजी निधन झाले.
Leave a Reply