प्रा. डॉ. आशा दस्तगीर आपराद

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा. डॉ. आशा दस्तगीर आपराद या मुस्लिम समाज आणि महिलांच्या प्रश्नांवर विपुल लेखन केलेल्या लेखिका म्हणून प्रसिद्ध होत्या. ‘भोगले जे दु:ख त्याला…’, हे त्यांचे आत्मकथन गाजले.

हिंदी भाषेच्या प्राध्यापिका असलेल्या प्रा. आपराध या सत्यशोधक चळवळीतील कोल्हापूरच्या टीममध्ये हुसैन जमादार यांच्यासोबत सक्रिय होत्या. त्यांचा विविध सामाजिक चळवळींशी संबंध होता. महिला दक्षता समित्या आणि इतर सामाजिक संघटनांबरोबर त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे मानले जाते.

प्रा. आशा आपराद यांनी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेले ‘भोगले जे दु:ख त्याला…; हे आत्मचरित्र गाजले. अत्यंत धाडसाने लिहिलेल्या या आत्मकथनपर कादंबरीला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांच्या वाट्याला येणारे आयुष्य आत्मकहाणीच्या रूपात ओघवत्या भाषेत अत्यंत संवेदनशीलतेने मांडणारी लेखिका म्हणून त्यांच्या आत्मकथनावर वाचकांनी पसंतीची मोहोर उठवली. उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दलचा पुरस्कार देऊन भैरूरतन दमाणी प्रतिष्ठानने नुकताच त्यांचा उचित गौरवही केला.

आपराद यांच्या ‘भोगले जे दु:ख त्याला…’ आत्मकथनाचे ‘दर्द जो सहा मैंने…’ असे हिंदी भाषांतरही करण्यात आले आहे.

प्रा. आपराद यांना मिळालेले पुरस्कार
  • भैरुरतन दमानी पुरस्कार
  • महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
  • महाराष्ट्र शासन उत्कृष्ट मराठी वाडमय राज्य पुरस्कार

यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवार, २३ ऑगस्ट २०१९ रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. निधनसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या.

## Aparad, Aparad (Prof. Dr.)
Author and Social Worker. Kolhapur

(Last Updated on : 23 Aug 2019)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*