मराठी नाट्यसृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नाव घ्यायचं असेल तर ते पुरुषोत्तम बेर्डे ह्यांचं.
पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी १९७५ साली सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमधून डी.जी. आर्ट हि पदविका घेतली. मग पुढे ८ वर्षं ते जाहिरात क्षेत्रात काम करत होते.१९७८ साली “या मंडळी सादर करु या” या नाट्य संस्थेतर्फे “अलवार डाकू” नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व संगीत केले. १९८३ साली चौरंग ह्या त्यांच्या नाट्यसंस्थेतर्फे “टूरटूर” हे नाटक त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणले. त्यानंतर आजपर्यंत १० नाटकांचे लेखन, २० नाटकांचे दिग्दर्शन, ६० नाटकांचे संगीत दिग्दर्शन, ५ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. “जाऊबाई जोरात” हे अलिकडे त्यांचे गाजलेले नाटक होय. १९८९ पासून ते चित्रपट दिग्दर्शनात आहे व आतापर्यंत त्यांनी ९ चित्रपट प्रदर्शित केले आहेत.
२००५ पासून ठाण्यात वास्तव्यास असलेले बेर्डे म्हणतात की त्यांची कलाकृती ही प्रेक्षकांनी उचलून धरली आणि म्हणून ठाण्यात एखादी उद्योन्मुख कला अकादमी सुसरु करण्यात त्यांचा मानस आहे.
अशा ह्या अवलीयाला त्यांच्या “अलवार डाकू” नाटकासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. तसेच मुंबई नाट्य दर्पण पुरस्कार “जाऊबाई जोरात” ह्या नाटकाला २००० साली २७ पुरस्कार मिळाले. “हमाल दे धमाल” ह्या चित्रपटासाठी ४ राज्यपुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. “भस्म” व “तावीज” साठी अनुक्रमे राज्य व राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. नाशिक नाट्य परिषद २००३ साली वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार त्यांना त्यांच्या ३० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल मिळाला.
२०१० साली पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानीतही करण्यात आले आहे. आय.एन.टी. मध्ये ३ वर्षे सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं.
Leave a Reply