मराठी चित्रकार आणि नेपथ्यकार पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म १ नोव्हेंबर १८८८ रोजी वाई जवळ मेणवली येथे झाला.
पुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. १९२१ साली ते ललितकलादर्श नाटक कंपनी पडदे रंगवायले जे आले ते १९३७ साली ती कंपनी बंद होईपर्यंत तेथेच होते.
१९२२ सालीच पुरुषोत्तम श्री काळे यांनी भा.वि. वरेरकर यांच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाकाच्या रंगमंच सजावटीत स्टेजवर आतल्या पडद्यांऐवजी ‘बॉक्स सेट’ चा वापर केला हा अशा प्रकारचा वापर मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच झाला होता.
१९३३ साली रंगमंचावर आलेल्या ‘आंधळ्यांची शाळा’ या श्री.वि. वर्तकलिखित नाटकात आलेला दिवाणखाना पुढे दशकानुदशके कायम येत राहिला. या अमर दिवाणखान्याचा जन्म पु.श्री. काळे यांनी ’सत्तेचे गुलाम’ या नाटकातून केला.
या नाटकाच्या सुरुवातीलाच मृत्युपत्राया वाचनासाठी एक दिवाणखाना उभारला होता.या दिवाणखान्याची लांबी, रुंदी आणि भिंतींची जाडीही दाखवण्यात आली होती. चांगल्या फर्निचरने आणि सुशोभित खिडक्या दरवाज्यांना साजेसे पडदे लावून शृंगारलेला हा दिवाणखाना मराठी रंगभूमीवर अजरामर झाला.
नाट्य- चित्रकलेच्या प्रांतात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अनेक व्यक्ती पु.श्री.काळे यांच्या सहवासात आल्या. त्यात केशवराव भोसले (‘ललितकलादर्श चे मालक), बापूराव कोल्हटकर (‘ललित कला आदर्श चे उत्तराधिकारी), सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर), नारायणराव राजहंस (बालगंधर्व), मामा वरेरकर (लेखक), बाबूराव पेंटर (चित्रकार), गोविंदराव टेंबे (पेटीवादक), बशीर खान (गायक), गोपाळराव गो. फाटक, बाबूराव देवभक्त.
मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे.
Leave a Reply