‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’, ही प्रार्थना आपल्या सुरेल स्वरांनी अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांचा जन्म १५ मार्च १९४३ रोजी मुंबईत झाला.
पुष्पा चंद्रकांत पागधरे या माहेरच्या पुष्पा चामरे. पुष्पा पागधरे यांचे मूळ गाव सातपाटी असून त्यांच्या वडीलांचे नाव जनार्दन आणि आईचे नाव जानकी चामरे आहे. सातपाटीलाच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत.
सातपाटीच्या शाळेतील एक शिक्षक भिकाजी नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात पुष्पाताई जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला हे गाणे गायल्या. ते ऐकून मुंबईचे तत्कालीन महापौर बाबासाहेब वरळीकर यांनी पागधरेंना मुंबइला यायला सांगितले.
प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी त्यांना प्रथम ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या चित्रपटात गायनाची संधी दिली. त्यानंतर त्यांची अनेक लोकगीते गाजली. त्यांनी मराठीसोबत हिंदी, भोजपुरी, ओडिया, बंगाली, मारवाडी, हरियाणवी, पंजाबी, गुजराती आणि आसामी भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. या भक्कम पायामुळे पुष्पा पागधरे यांचे गाणे एका वेगळ्या उंचीवर पोहोचले.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी राज्य सरकारतर्फे त्यांचा दोनदा सन्मान करण्यात आला आहे. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
Leave a Reply