महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म १४ जानेवारी १८८२ रोजी झाला.
रघुनाथ धोंडो कर्वे हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होत. र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके १९४० च्या सुमारास प्रसिद्ध होत असत. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले.
त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों. कर्वे यांनी १५ जुलै १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे विचार करून आपली मते बनवणे व ती निर्भीडपणे मांडणे हे र. धों. कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होय. यासाठी त्यांना सरकारी खात्यातील नोकरीही प्रसंगी गमवावी लागली. १९२७ ते १९५३ अशी सुमारे २५-२६ वर्षे कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक मोठ्या निष्ठेने, कमालीच्या निग्रहाने चालवले. त्याद्वारे लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला.
जुलै १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्या’चा पहिला अंक निघाला. या या अंकात हे मासिक सुरू करण्यामागचा आपला उद्देश रघुनाथरावांनी सांगितला आहे. ‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते व ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे.
समाजस्वास्थ्यातील प्रचारामुळे त्यांच्यावर खटलेही भरले गेले. जवळजवळ सत्तावीस वर्षे रघुनाथरावांनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालवले. अश्लीलीलता हा कोणत्याही लेखाचा, सदराचा किंवा इतर वस्तूचा गुण नसतो, तो फकत तसा आरोप करणाऱयाच्या मनाचा गुण आहे, हे सांगणाऱ्या रघुनाथरावांच्या या कार्याचे परिणाम तत्कालीन समाजस्वास्थ्यावरही झाले.
फ्रान्स येथील वास्तव्यामध्ये र.धों कर्वे यांनी बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून संततिनियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. स्वतःच्या बिऱ्हाडातच त्यांनी पहिले संततिनियमन केंद्र चालू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. समाजस्वास्थ्य नावाचे मासिक चालू केले. एका वसंत व्याख्यान मालेत त्यांनी स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले.
२१व्या शतकातील भारतातल्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्नी्ने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे मागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना रँग्लर परांजपे ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला.
फ्रेंच भाषेचे र.धों. कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत. नाटक, सिनेमा, ललित वाङ्मय ह्यावर समाजस्वास्थ्यात टीकात्मक लेख व परीक्षणे येत. साहित्य, संगीत, अन्य कला यांची त्यांना तहान होती. देशात व जगात काय चालले आहे ह्याचे त्यांचे अवलोकन तिखट होते.
रघुनाथरावाणी गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणेच वैचारिक मार्ग पत्करला होता. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेलेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.
रघुनाथ धोंडो कर्वे यांचे निधन १४ ऑक्टोबर १९५३ रोजी झाले.
Leave a Reply