ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचा जन्म १९३० सालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण या गावी झाला.
कलाक्षेत्रातील महत्त्वाच्या काळाचे साक्षीदार असणार्याक राजा मयेकरांनी नाटक, चित्रपट, मालिका या सर्व क्षेत्रात पाचशेहून अधिक कलाकृतींमध्ये काम केले होते.
राजा मयेकरांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण या गावातच झाले. त्यांचे वडील तानाजी मयेकर मुंबईत ‘युनियन मिल’मध्ये कर्मचारी होते. राजा यांची शिक्षणाची ओढ बघून पुढील शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना मुंबईमध्ये आणले. काही दिवसातच त्यांची आई इतर चार भावंडांना घेऊन मुंबईत आली.
राजा मयेकरांचे कलागुण लक्षात घेता त्यांचे वर्गशिक्षक त्यांना शालेय वेशभूषा स्पर्धेत भाग घेण्यास आग्रह करत. त्याकाळी वेशभूषा, अभिनय यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार्यास स्पर्धकांच्या वाजतगाजत मिरवणुकी निघत. त्यामुळे या मिरवणुका बघण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. त्या गर्दीत हरहरवाला चाळीचे रहिवासीही असायचे. त्यांनी राजा यांना स्पर्धकांच्या गर्दीत पाहिले होते. त्यामुळे राजा मयेकर चांगला अभिनय करतात, हे चाळीतील सांस्कृतिक मंडळाच्या सभासदांच्या लक्षात आले. त्यांनी मयेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बसवलेल्या बालनाट्यांतून कामे दिली.
‘कोकण्याचं पोर कसं बामनावानी बोलतंय बघा’ असं अभिमानाने बोलायचे.” यामुळेच साबळे यांनी कृष्णकांत दळवी व राजा मयेकर यांना सोबत घेत ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ची स्थापना केली. या माध्यमातून मयेकर यांनी केलेल्या लोकनाट्यातील भूमिकांमधून त्यांना एक कलाकार म्हणून खरी ओळख मिळाली. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना ते शाहीर साबळे यांचा उल्लेख आवर्जून करत असत. सहाव्या इयत्तेनंतर मयेकरांना शिक्षण आणि हरहरवाला चाळीतले घर सोडावे लागले. त्यावेळी त्यांच्या वडिलांची तब्येत खूपच खालावली होती. त्यानंतर राजा आपल्या आई-वडील आणि भावंडे यांच्यासह डिलाईल रोडवरच्या वाण्याच्या चाळीतील भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले.
राजा मयेकर यांचे १५ फेब्रुवारी २०२० रोजी निधन झाले.
राजा मयेकर यांच्या कलाकृती.
लोकनाट्य : यमराज्यात एक रात्र, आंधळ दळतय, रूपनगरची मोहना, हळू बोला घोड हसलं, एक्याची वाडी, कोयना स्वयंवर, नशीब फुटके साधुन घ्या, बापाचा बाप, ग्यानबाची मेख.
नाटक : गुंतता हृदय हे, आई, धांदलीत धांदल, एकच प्याला, संशयकल्लोळ, बेबंदशाही, श्यामची आई, झुंजारराव.
चित्रपट : धाकटी बहीण, स्वयंवर झाले सीतेचे, अर्धांगी, नवरे गाढव असतात, वहिनी, येडे का खुळे, धमाल गोष्ट नाम्याची, भालू, झंझावात, कळत नकळत.
Leave a Reply