राजा ठाकूर

मराठीतले एक यशस्वी दिग्दर्शक

दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला.१९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं.

राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. व राजा ठाकूर यांच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं ‘बलिदान. १९४७ च्या ‘बलिदान’ पासून ते १९५३ पर्यंत सुमारे १५ चित्रपटांचं संकलन राजानं केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम संकलक म्हणून नाव मिळवलं.

संकलक राजा ठाकूर हे दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे घनिष्ठ सहकारी होते. छायाचित्रकार बाळ बापट आणि संकलक राजा टाकूर हे राजाभाऊ परांजप्यांचे डावे-उजवे हात होते. राजा ठाकुरांनी संकलक म्हणून नाव कमावलं. परंतु त्यांच्या मनात एक ‘प्रतिभावंत’ कल्पक दिग्दर्शक दडला होता. १९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.

दिग्दर्शक म्हणून राजा ठाकूरांची अनेक वैशिष्ठ्ये होती.

राजा ठाकूर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

मराठीतले एक यशस्वी दिग्दर्शक राजा ठाकूर (29-Jul-2017)

मराठीतले उत्तम संकलक राजा ठाकूर व एक यशस्वी दिग्दर्शक राजा ठाकूर (26-Nov-2018)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*