राजन भिसे एक हसतमुख अभिनेता म्हणून ओळख टीव्ही व रंगभूमी वर आहे.
राजन भिसे यांचा जन्म २८ फेब्रुवारीला झाला.
त्याच्या अभिनयात नेहमी वेगळेपण पाहायला मिळते. स्वत: राजन भिसे आकिर्टेक्ट असल्यामुळे गेली कित्येक वर्षे ते रंगभूमीवर उत्तम नेपथ्यकार म्हणून ही भूमिका पार पाडत असतात. राजन भिसे यांनी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल टाकलं ते चौथीत असताना. त्यांचे शालेय शिक्षण वांद्रे इथल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले. शाळेत असताना आंतरशालेय हिंदी नाटकांची स्पर्धेत त्यांनी हिंदी नाटकातही काम केले घेतलं.
आर्किटेक्ट होऊन नोकरीसाठी राजन भिसे बहारिनला गेले. तेथील मराठी ग्रुपनं गणेशोत्सवात बहारिनमध्ये पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हा तिकडे पहिल्यांदाच राजन भिसे यांनी ‘काका किश्याचा’ हे नाटक बसवलं होतं. त्यावेळी स्थानिकांकडून आणि भारतीय राजदूतांकडून राजन भिसे यांचे त्या नाटकासाठी कौतुक झालं.
राजन भिसे नोकरी सोडून १९८७ साली भारतात परतले. भारतात आल्यानंतर पुन्हा एकदा ते नाटकाशी जोडला गेलो. भारतात परतल्यावर आर्किटेक्चर कॉलेज मधील त्यांचा मित्र प्रदीप सुळे यानं त्यांना ‘आंतरनाट्य’ संस्थेत काम करशील का? असं विचारलं. ‘गॅलिलीओ’ हे नाटक त्या संस्थेकडून बसवण्यात येत होतं. ‘आंतरनाट्य’मध्ये अरुण नाईक, राजीव नाईक, अजित भुरे, विजय केंकरे, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, संजय मोने, तुषार दळवी, श्रीरंग देशमुख अशी मंडळी होती.
‘आंतरनाट्य’ संस्थेत काम करत असताना दामू केंकरे यांच्या ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकात राजन भिसे यांनी काम केले. सुरुवातीला जेव्हा दामू केंकरे यांनी हे नाटक बसवलं होते, तेव्हा त्या नाटकात दिलीप प्रभावळकर, माधव वाटवे, बाळ कर्वे, मोहन गोखले, सदाशिव अमरापूरकर अशा कलाकारांची तगडी फळी होती. ‘सूर्याची पिल्ले’ हे त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक.
जयंत पवार यांचे ‘माझं घर’, प्रशांत दळवी यांचं ‘सेलिब्रेशन’ हे नाटक ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘ढोलताशे’ अशी अनेक नाटके त्यांनी केली आहेत. अभिनय व नेपथ्य या बरोबरच सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काम राजन भिसे बघत आहेत.
Leave a Reply