शिवसेना, भाजप, आणि लोकभारती पक्षाच्या आघाडीने उल्हासनगर महानगरपालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर शहराच्या विकासाला गती देण्याची यशस्वी कामगिरी राजश्री शिंदे यांनी केली. त्यांनी महापौरपद स्वीकारल्यापासून शहराचा विकास झपाटयाने होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शहराच्या विकासासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. यात शहराच्या विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करून त्यात इमारतीची उंची वाढविणे, आरक्षण स्थलांतर, अंतर्गत बदल आणि चटई क्षेत्राच्या लगतच्या जागेत बदल करणे बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहराच्या विविध ठिकाणी वाहतुक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. त्यापैकी उल्हासनगर स्टेशनला सॅटिस, पादचारी पुल, रिक्षा स्टँड, वाहनतळ, भाजी मार्केट, व्यापारी संकुल, गणेश विसर्जन घाट असे महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले. शहरातील महत्वाच्या रस्त्यांचे त्यांनी सिमेंट काँक्रिटीकरण केले.
गोरगरिबांसाठी त्यांनी समाजमंदिरे बांधून दिली. त्यांच्या कारकिर्दित ४० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
Leave a Reply