राजीव दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९६७ रोजी झाला.
राजीव दीक्षित यांनी स्वदेशी चळवळ बळकट केली, आपल्या अनेक व्याखानांतून त्यांनी स्वदेशी उत्पादनांबद्दल जनमानसात प्रचार केला व लोकांना स्वदेशी वापराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते भारतीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. राजीव भाई दीक्षित एक क्रांतिकारी होते. त्यांनी संपूर्ण भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. ते स्वदेशी जागरणकर्ता होते. राजीव दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर इ.स. १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील, अलिगढ जिल्ह्यातील नाह गावात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले.
२० वर्षांच्या कालावधीत दीक्षित यांनी जवळपास १२ हजार पेक्षा अधिक व्याख्याने दिली. भारतात ५ हजार हून अधिक परदेशी कंपनींविरोधात त्यांनी स्वदेशीच्या आंदोलनाला सुरुवात केली. ९ जानेवारी २००९ रोजी त्यांनी भारत स्वाभिमान ट्रस्टचा कार्यभार स्वीकारला.
स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या ध्वनिफितींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ती नंतर लोकांना उपलब्ध होतील याची परिपूर्ण काळजी घेतली होती.
भारताचा काळा पैसा विदेशी बँकांमध्ये अनधिकृतरित्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले. स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला. जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वस्तू वापरल्या तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले. त्याचप्रमाणे भारतीयांनी गैर मार्गाने मिळवून स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या सर्व काळ्या पैशाची माहिती उघड व्हावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. ही दोन कामे त्यांची विशेष उल्लेखनीय ठरली.
भारत एक कृषीप्रधान देश असल्याने या चळवळीने शेतीलाही आपले पहिले प्राधान्य मानले आहे. त्या अंतर्गत देशी पद्धतीने शेती करण्यास शेतकर्यांरना प्रोत्साहन दिले जाते. या चळवळीमध्ये रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत, गांडुळे आणि शेणखत वगैरे वापरण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. चळवळीची दुसरी प्राथमिकता म्हणजे प्रत्येक गावात स्वदेशी वस्तूंचे उत्पादन.
बाबा रामदेव आणि राजीव दीक्षित यांनी ६३८३६५ एवढ्या गावांमध्ये आंदोलन पोहोचवण्यासाठी एका न्यासाची स्थापना केली. ५ जानेवारी २००९ रोजी दिल्लीमध्ये या न्यासाची नोंदणी करण्यात आली. भारताच्या निद्रावस्थेत गेलेल्या स्वाभिमानाला जागवण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर एक राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचे या न्यासाचे उद्दिष्ट आहे. भारत स्वाभिमान आंदोलनाद्वारे स्वदेशी वस्तूंच्या प्रचारासोबत परदेशी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे काम करण्यात येते.
भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौर्या,वर असताना, ३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे प्राथमिकरित्या समजण्यात आले होते, परंतु अजूनही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अज्ञात आहे, पण राजीव दीक्षित यांच्या निधनानंतर ही चळवळ उधळली गेली आणि कामगारांमध्ये फूट पडली. ही चळवळ राजीव दीक्षित आणि क्रांतिकारकांचे स्वप्न पूर्ण करण्यात अपयशी ठरली.
Leave a Reply