राजेंद्र खेर

प्रसिद्ध लेखक राजेंद्र खेर यांचा जन्म ३ जानेवारी १९६१ रोजी झाला. राजेंद्र खेर हे, आपले आजोबा द. म. खेर आणि वडील भा. द. खेर यांच्या लेखनाचा वारसा पुढे चालवणारे लेखक म्हणून ओळखले जातात. एक विशेष योगायोग म्हणजे ‘हॉलिवूडचे विनोदवीर’ हे त्यांचं पहिलं पुस्तक त्यांच्या वडिलांच्या, भा. द. खेरांच्या ‘पूर्णाहुती’ या १०० व्या पुस्तकाच्या प्रकाशानाच्या सुमारासच प्रसिद्ध झालं होतं! त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषांमधून अनुवाद झाले असून अलीकडच्या यशस्वी साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. त्यांची जवळपास सर्व पुस्तकं रसिकमान्य ठरली आहेत.

बिंदुसरोवर, देह झाला चंदनाचा, देवांच्या राज्यात, धनंजय, दिग्विजय, गीतांबरी, दी साँग ऑफ सॅल्व्हेशन, उदयन अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. राजेंद्र खेर यांचे पांडुरंगशास्त्री आiठवले यांच्या जीवनावरचे ‘देह झाला चंदनाचा’ हे पुस्तक, त्याच्या १९ आवृत्त्या निघाल्या, त्याचे गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरे ही झाली.

राजेन्द्र खेर यांनी आजपर्यंत महाभारताचे वास्तव दर्शन, महाभारतातील अतर्क्य, प्राचीन विचार आणि आधुनिक आचार, मृत्यूनंतरचे जीवन आणि परलोकांचं स्वरूप, आद्य क्रांतिकारक भगवान श्रीकृष्ण, भग्वदगीतेची वैश्विकता, देव हे परग्रहावरील अतिमानव होते? अश्या विविध विषयांवर जवळपास ४०० व्याख्यानं दिली आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*