दक्षिणेतील देव’ अशी ओळख असलेले रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे झाला. रजनीकांत यांचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत.
सुरवातीच्या २०-३० वर्षांमध्ये त्यांचा गावाकडे संपर्क होता पण कालांतराने तो तुटला, ‘अपूर्व रागंगल’ या तामिळ सिनेमाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता. अभिनय क्षेत्रात येण्याआधी रजनीकांत बंगळूरमध्ये एस.टी. कंडक्टर म्हणून काम करत होते.
रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत यांनी फिल्मी इंडस्ट्रीतील नुकतीच आपल्या करिअरची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केली आहेत.
रजनीकांत अभिनयाबरोबरच आपल्या डॅशिंग स्टाईल आणि स्टंट्साठी ओळखले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रजनीकांत यांचे चाहते आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतल्या या सुपरस्टारने ‘अंधा कानून’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण साऊथ इंडस्ट्रीप्रमाणे हिंदी सिनेमात रजनी यांचा पाहिजे तसा करिष्मा चाललाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यानी आपले लक्ष्य दाक्षिणात्य सिनेमांवर केंद्रीत केले.
रजनीकांत यांना दाक्षिणात्य राज्यात अगदी देवासमान मानतात कारण त्यांची ‘समाजसेवा’ आहे. ते त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या एकूण ४० % एवढी रक्कम समाजसेवेसाठी वापरतात शिवाजी या चित्रपटासाठी त्यांनी रक्कम घेतली होते त्यातील ८ कोटी त्यांनी चॅरीटी संस्थांना दिले. आणि महत्त्वाचे म्हणजे ते एकाही उत्पादनाची जाहिरात करत नाहीत त्यामागे त्यांचा उद्देश एकच कि लोकांना चुकीचा संदेश जाऊ नये. आज मितीला रजनीकांत हे भारतातील सर्वात महागडे सुपरस्टार आहेत.
तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिक्षीत सम्राट, प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकी बद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत जाणले जातात. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे.
जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत. रजनीकांत यांना आजवर चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. लता रंगाचारी यांच्या बरोबर रजनीकांत यांचा विवाह झाला आहे. लता रंगाचारी या तामिळ असून चेन्नईत त्यांचा जन्म झाला.
लता ८० च्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी सिनेमांशी जोडलेल्या होत्या. त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहे. याशिवाय त्या ‘द आश्रम’ या शाळेच्या संचालिका आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सौंदर्या आणि ऐश्वर्या ही त्यांची नावे आहेत. ऐश्वर्या हिचे लग्न दाक्षिणात्य अभिनेता धनूषसोबत झाले आहे. तर सौंदर्याचे लग्न व्यावसायिक असलेल्या अश्विन रामकुमारसोबत झाले आहे.
Leave a Reply