मुंबईमधील जेष्ठ कामगार नेते व राष्ट्रिय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस रामचंद्र हुलावळे हे कामगारांच्या आयुष्यातील सदैव तेवणार्या दीपस्तंभासारखे होते. मुंबई मधील गिराणी कामगार व त्यांच्या हजारो कुटुंबियांच्या व्यथा, वेदना, सुख, दुःख, व आकांक्षा ते प्रत्यक्ष जगले. १९७५ साली रामचंद्र हुलावळेंनी मुंबईतील घोडपदेव प्रभागाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले होते. हुलावळेंचा गेली पन्नास वर्षे कामगार चळवळीला फुलविण्यात व स्वयंपूर्ण बनविण्यात मोलाचा सहभाग होता. १९५५ च्या सुमारास “रिव्हॉल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया” च्या चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांच्या निडर व ताठ कण्याची, तसेच स्पष्टवक्तेपणाची प्रचिती सर्वांना आली होती. नंतर १९६२ साली रामचंद्र हुलावळेंनी ग. द. आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघात प्रवेश केला होता.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply