आपण नेहमी ऐकतो ती गाणी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, ते नयन बोलले, पाहुनी पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला ही सर्व रमेश अणावकर यांनी लिहली आहेत. सुरेल व अवीट गाणी देणारे रमेश अणावकर ह्यांची गाणी लताजी, आशाजी, अशा अनेक गायक, गायकानी गायली, व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचली.
आपण लहान पणापासून ऐकत असलेले हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग चेडवा दिसता कसा खंडाळ्याचो घाट हे गाणेही रमेशजीचे आहे. रमेश अणावकर यांनी मालवणी भाषेतही अनेक गाणी लिहली आहेत. रमेश अणावकर यांचे ३० जानेवारी २००४ रोजी निधन झाले.
Leave a Reply