रंगनाथ पठारे हे कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. रंगनाथ पठारे यांचा जन्म १ जून १९५० रोजी झाला. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले. मात्र, ते रमले कथा-कादंबरीत.
‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीने त्यांच्या लेखन प्रवासाला सुरुवात झाली. पुढे या प्रवासात काही टप्पे आले. प्रत्येक टप्प्यांवर ते आपल्या लेखनगुणांना सिद्ध करीत गेले. ‘ताम्रपट’ या त्यांच्या श्रेष्ठ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘भर चौकातील अरण्यरुदन,’ ‘दु:खाचे श्वापद,’ ‘टोकदार सावलीचे वर्तमान ‘ २००६मध्ये आलेली ‘कुंठेचा लोलक’ अशा कादंबऱ्यांमधून त्यांनी वास्तववादी साहित्याला आकार दिला.
‘ताम्रपट’ ही कादंबरी समाजातील विसंगती टिपत व्यामिश्रतेची उकल करण्यास प्रवृत्त करते. १९४२ ते १९७९ असा दीर्घ कालपट असलेली ही कादंबरी महाराष्ट्राचा राजकीय व सामाजिक अंगाने वेध घेते. आदर्शवादी नाना सिरूर, सहकारातून राजकारणात आलेले दादासाहेब भोईटे, राजकारणाकडे व्यवसाय म्हणून पाहणारे भाऊसाहेब देशमुख.
तटस्थतेच्या याच झळाळीने मराठी साहित्याच्या कमान चमकदार राहिली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू असताना साहित्य अकादमीच्या केंद्रवर्ती समितीवर मराठी भाषेसाठी समन्वयक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड झाली.
Leave a Reply