सुप्रसिध्द अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या असलेल्या रंजना देशमुख यांनी लहानपणीच कलाक्षेत्रात पदार्पण केले. पुढे १९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या.
व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली. ‘अरे संसार संसार’ आणि ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजना देशमुखला राज्यसरकारचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रंजना देसमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’. रंजना देशमुख यांनी ‘फक्त एकदाच’ या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केले.
१९८७ साली रंजना देशमुखना झालेल्या अपघातामुळे चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली.
३ मार्च २००० साली, मुंबई येथे हृदय बंद पडून तिचे निधन झाले.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
रंजना देशमुख यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी अभिनेत्री रंजना देशमुख (5-Mar-2018)
मराठी अभिनेत्री रंजना देशमुख (4-Mar-2017)
Leave a Reply