पुराणिक, रश्मी

रश्मी पुराणिक ह्या झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ पत्रकार असून त्याआधी त्या ई टी. व्ही. मराठी वाहिनीवरील बातमी सदरामध्ये रिपोर्टर म्हणून काम करत होत्या.

प्रवासाची व भटकंतीची उपजत असलेल्या रश्मी यांना अशा वाहिनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या शोधमोहिमा व निवासी ग्रामभेटींमध्ये खुप रस असतो. पत्रकारिता हे त्यांचे लहानपणापासुन आवडते क्षेत्र असल्यामुळे, व सळसळता उत्साह त्यांच्या प्रत्येक कार्यातुन आजवर उमटत आल्यामुळेच, की काय परंतु या काहीशा पुरूषप्रधान क्षेत्रात त्या यशस्वीपणे आपले अटळ स्थान निर्माण करू शकल्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण ए. व्ही. स. विद्यामंदीर विरार येथे झाले तर एस. के. सोमैय्या या कॉलेजमध्ये पत्रकारितेची डिग्री संपादन केल्यानंतर कुठलाही प्रत्यक्ष अनुभव किंवा विशेष प्रशिक्षण गाठीशी नसताना त्या लगेचच ई टी. व्ही. वाहिनीसाठी रिपोर्टर म्हणून रूजु झाल्या होत्या. हे धाडसी पाऊल उचलल्या नंतर केवळ चुका व शिका या तत्वाच्या बळावर त्या या क्षेत्रातील सारे बारकावे व खाच खळगे अगदी उत्तमरित्या व सफाईदारपणे शिकल्या. एखाद्या व्यवसाय करण्याचा उत्साह व हुरहुर असली, की सराईतपणा व कौशल्येदेखील वेळ आल्यावर हात जोडुन येतात हे त्यांच्या आजवरच्या प्रवासावरून स्पष्ट होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*