श्री रविंद्र प्रभुदेसाई हे एक प्रसिद्ध मराठी उद्योजक. त्यांच्या “पितांबरी” या ब्रॅन्डखाली बनविली जाणारी उत्पादने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत.
शिक्षण पूर्ण झाल्यावर एक वेगळा मार्ग चोखाळत त्यांनी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
सर्वप्रथम घराघरात लागणार्या तांबा, पितळ इत्यादिपासून बनलेल्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी त्यांनी “पितांबरी शायनिंग पावडर”ची
निर्मिती केली. अल्पावधीतच गृहस्वच्छता विषयक गुणवत्तापूर्ण उत्पादनमालिका विकसित करत त्यांनी या व्यवसायात आपला जम बसवला.
त्यांच्या व्यवसायातील यशात त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि आयुर्वेदिक ग्रंथाच्या आधारे आरोग्यदायी उत्पादननिर्मिती या गोष्टींचा महत्त्वाचा वाटा आहे.
गृहस्वच्छता, आरोग्य आणि शेती विभागात पितांबरीद्वारे १९ गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती आणि विक्री केली जाते. अन्य लघु उद्योजकांकडून बनविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची विक्री करणारी यंत्रणाही त्यांनी उभी केली आहे. उत्पादन निर्मिती व आर अॅंड डी यासाठी त्याना विशेष प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
भारतातील १८ राज्यांसह जगभरात ६ देशांमध्ये पितांबरीची विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. विविध कार्यक्रम आणि उपक्रमांना प्रायोजकत्व, अनेक सामाजिक संस्था, संघटना, उदयोन्मुख कलाकार व गरजू व्यक्तींना अर्थसहाय्य, रा.स्व.संघ, सनातन संस्था यांसारख्या राष्ट्र-धर्म-संस्कृती यांच्या उत्थानाकरिता चाललेल्या कार्याला साहाय्य व त्यात प्रत्यक्ष सहभाग यामध्ये ते नेहमीच पुढे असतात. लघुउद्योग भारती, सॅटर्डे क्लब यांसारख्या उद्योग संघटनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
पुरस्कार : उद्योगश्री पुरस्कार, मदर इंडिया पुरस्कार, राष्ट्रीय उद्योग प्रतिभा पुरस्कार, ज्वेल ऑफ टिसा, इंडस्ट्री मॅन ऑफ द इयर
Leave a Reply