बॉलीवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा जन्म १७ डिसेंबर १९७८ रोजी झाला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा तो मुलगा.
बॉलीवूडमध्ये वेगळी उंची गाठल्यानंतर मराठमोठ्या रितेशने मराठी चित्रपट सृष्टीकडे वळून ‘लयभारी’ पदार्पण केले.
चित्रपटात ‘अँग्री यंग मॅन’ लूकसोबत या चित्रपटाला रितेशने दुहेरी भूमिकेची किनार दिली आणि चाहत्यांना ‘लयभारी’ ट्रीट दिली. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व रेकॉर्ड मोडीस काढले. रितेश देशमुख यांनी मस्ती, हाऊसफुल आणि मराठी लय भारी यासारखी सिनेमे दिले. मात्र काही सिनेमांनी रितेश देशमुखला प्रोफेशनल आयुष्याबरोबरच पर्सनल आयुष्यात देखील खास मदत केली.
रितेश-जेनेलियाची प्रेमकथा सर्वांनाच माहित आहे. ३ जानेवारी २०१२ रोजी जेनेलिया रितेश देशमुखबरोबर विवाहबद्ध झाली. रितेश आणि जेनेलियाचे लग्नाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.
बॉलिवूड अभिनेत्री असण्याबरोबरच जेनेलिया एक मॉडेल आणि होस्टसुद्धा आहे. बॉलिवूडशिवाय जेनेलियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा काम केले आहे. जाने तू या जाने ना, फोर्स, तेरे नाल लव्ह हो गया, मस्ती, चान्स पे डान्स या बॉलिवूड सिनेमांमध्ये जेनेलिया झळकली आहे. याशिवाय जेनेलियाने अनेक जाहिरातीसुद्धा केल्या असून एक टीव्ही रिअँलिटी शोही होस्ट केला आहे.
Leave a Reply