प्रधान, रोहित अरविंद

प्रधान, रोहित अरविंद

साऊंड रेकॉर्डिंग व मिक्सिंग मध्ये ७ वर्षांचा अनुभव, चित्रपट, सिरियल्स आणि म्युझिक अल्बमचे काम केले आहे.म्युझिक प्रॉडक्शन मध्ये इंग्लंड मध्ये जाऊन मास्टर्स डिग्री मिळवली.

आपल्या ध्वनी रचनेने अनेक चित्रपटांची रंगत वाढविणारे ध्वनी मुद्रक रोहित अरविंद प्रधान म्हणजे ठाणेकरांना अभिमान वाटणारी ध्वनी मुद्रण क्षेत्रातील निष्णात व्यक्तीमत्व.

२००६ मध्ये लंडन येथील University of Wastiminter मध्ये ध्वनी निर्मिती या विषयातून (Audio
Production) त्यांनी एम.ए. केले. त्यानंतर आजपर्यंत गेली ७ वर्षे ानेक चित्रपट, मालिका यांसाठी साऊंड रेकॉर्डिंग व मिक्सिंग चे काम चालू करीत आहेत. ठाणेकर कलाकारांच्या सोयीसाठी २००७ मध्ये अद्ययावत यंत्रणेने सज्ज असलेला “मिक्स बॉक्स स्टुडिओ” प्रधान यांनी चालू केला. “ती रात्र”, “काळशेखर आहेत का?”, “हिप हिप हुर्रे”, “पाच नार एक बेजार”, “उचला रे उचला”, “शर्यत”, “अरे बाबा पुरे”, “खेळ मांडियेला” इत्यादी चित्रपटांसाठी ध्वनीरचना केली आहे. प्रधान यांनी बेडेकर कॉलेज यांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ठाण्यातच साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स सुरु केला. सध्या एल.एस. रहेजा महाविद्यालयात फिल्म डिपार्टमेंट मध्ये प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*