कलेचं शिक्षण आणि सामाजिक भान या दोन्हीचं एकत्रीकरण करणार्या ठाण्यातल्या कलाकार म्हणजे रुपाली मदन.
२००२ साली डी.सी. हॅन्डीक्राफ्ट तर्फे झालेल्या नॅशनल अॅवॉर्ड कॉम्पीटीशन हॅन्डीक्राफ्ट तर्फे झालेल्या नॅशनल अॅवॉर्ड कॉम्पीटीशन मध्ये सिलेक्शन झाले त्यानंतर के.पी.झे. प्रभू इन्स्टीट्यूट बंगळूर येथे जाऊन आर्टमध्ये शिल्पकलेतील स्टोन कार्व्हिंग व वुड कार्व्हिंगचे प्रशिक्षण घेतले आणि शिल्पकलेत मास्टरी केली आहे.
पूर्णवेळ शिल्पकला हे प्रोफेशन असून ठाण्यातील महानगर पालिकेची “जिद्द” शाळा येथील मतिमंद मूलांसाठी दोन वर्षे पॉटरी विषय शिकवण्याचे काम केले. सामाजिक परिस्थितीचे भान ठेऊन कलेच्या माध्यमातून आंधळ्या लोकांसाठी, भायखळा जेलमधील क्रिमिनल बायकांसाठी, अपंगांसाठी मातीकाम व कोरीवकाम यावर अनेक शिबीरे घेतली. २००७ मध्ये “आर्टिस्टीक” या नावाने एन्.जी.ओ. निर्माण केली. या संस्थेमार्फत मतिमंद मुले, धारावीतील बायका, अनाथ मुले यांच्याकडून कलापूर्ण वस्तू तयार करवून त्यांना मुंबई ते न्यूयॉर्क अमेरिकपर्यंत बाजारपेठ मिळवून देण्यात रुपाली मदन यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांची शिल्पकलेची प्रदर्शनं महाराष्ट्रात तसेच दिल्ली, कलकत्ता, दुबई येथे भरली असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
<!– – शिल्पकार
पत्ता : २०१, एफ्-विंग, यशराज पार्क, कासारवाडी, ठाणे (प.)
कार्यक्षेत्र : प्रोफेशनल आर्टिस्ट (शिल्पकार)
भ्रमणध्वनी : ९९६७३३६०६८
ई-मेल : rupeli.madan01@gmail.com
–>
Leave a Reply