एस.एम.जोशी यांनी आयुष्यभर सामान्यांसाठी जीव ओतून काम केले. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९०४ रोजी येथे झाला.
त्यांच्या स्फटिकासारख्या स्वच्छ, पारदर्शक, प्रामाणिक आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्वाने त्या काळात अनेकांना प्रेरणा दिली.
एस.एम. यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीतूनच झाली. काही विशिष्ट ध्येये, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊनच एस.एम. जोशी यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. युसूफ मेहेर अली यांच्या नेतृत्वाखाली युथ काँग्रेसमध्ये एस.एम.जोशी सहभागी झाले.
Leave a Reply