मराठी आणि हिंदी अशा दोन्ही रंगभूमीं, रुपेरी पडदा व मालिकांमधुन समीर धर्माधिकारींनी आपलं अनोखं स्थान निर्माण केलं असून, मराठीतला ‘चॉकलेट हिरो’ व ‘सुपरमॉडेल’ अशी ख्याती आहे. मुळचे पुण्यातील असणार्या समीर धर्माधिकारींनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून नाटकांची व कलेची लहानपणापासूनच आवड होती ; व्यावसायिक रंगभूमी तसंच चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याआधी अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये भुमिका साकारल्या. मुंबईत दाखल झाल्यानंतर समीर यांनी विमल सुटिग्स, डी-बीयर्स, नेस्कॅफे, आय.सी.आय.सी.आय बॅंक, रेमण्ड्स, कॉटनकिंग व गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीत काम केले असून असंख्य जाहिरातींचे प्रिंटशुट्स देखील केल्या आहेत.
उत्तम शरीरयष्टी, देखण्या व रुबाबदार अदा यामुळे समीर धर्माधिकारी यांचं व्यक्तिमत्व नायक, खलनायक यासह सर्वच भूमिकांना शोभेल असंच आहे. निर्मला मच्छिंद्र कांबळे, दिल क्या करे, सत्ता, रेनकोट, मनोरंजन-द एंटरटेन्मेंट, अग्नीपंख, मुंबई मेरी जान, गेम, रंग रसिया, सिटी ऑफ गोल्ड अश्या हिंदी तर; रेसटॉरंट, लालबाग परळ, मॅटर, बाबुरावला पकडा, समांतर, मात अश्या मराठी चित्रपटातून समीर धर्माधीकारींनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. पत्नी अपर्णासोबत ‘सलाम सिनेमा’ या होम प्रोडक्शन अंतर्गत ” निरोप ” एका वेगळ्या विषयाच्या मराठी चित्रपटाची निमिर्ती करून २००७ सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून रजत्त कमळाचं पारितोषिक पटकावलं.
हिंदी मालिकांमधून समीर धर्माधिकारी यांनी बुध्द, झांसी की रानी, यहॉं मै घर घर खेली, महाभारत, मै तेरी परछाई हूं फीयर फाईल्स मध्ये भुमिका साकारल्या असून त्यामधले कमालीची वैविधता जाणवते.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
Leave a Reply