सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी मिरज येथे ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला.
सरस्वतीबाई राणे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच मराठी-हिंदी चित्रपटांसाठी पार्शवगायन, भावगीत गायन, संगीत रंगभूमीवर अभिनय असे त्यांचे विविधांगी कर्तृत्व होते. गायिका मीना फातर्पेकर यांच्या त्या आजी होत.
उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांच्याकडून सुरू झालेली किराणा घराण्याची परंपरा पुढे सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, कमलाबाई बडोदेकर या भावंडांनी समर्थपणे सुरू ठेवली. त्यांनी किराणा घराण्याला अनेक दिग्गज गायक दिले. संगीत एकच प्याला..संशय कल्लोळ..संगीत सौभद्र या मराठी संगीत नाटकात सरस्वतीबाई राणे यांनी कामे केली होती.
सरस्वतीबाई राणे यांचे निधन १० ऑक्टोबर २००६ रोजी झाले.
Leave a Reply