ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी

अभिनेता, दिग्दर्शक

जयवंत नाडकर्णी हे नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांचे शिष्य होते. जयवंत नाडकर्णी यांनी नानासाहेबांसोबत हॅम्लेट आणि इतर व्यावसायिक नाटकांत भूमिका केल्या. शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वतुर्ळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ह्या नाटकात जयवंत नाडकर्णी यांनी प्रमूख भूमिका केल्या होत्या.

जयवंत नाडकर्णी यांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाची अनेक सुवर्ण पदके प्राप्त झाली होती.

जयवंत नाडकर्णी यांचे १३ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*