कदम, शार्दुल संभाजी

ठाण्यातील चित्रकला क्षेत्रातील एक तरुण व्यक्तिमत्व म्हणजे शार्दुल संभाजी कदम हे होत. व्यावसायिक चित्रकार म्हणून पुढे येत असलेले शार्दुल कदम हे सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये अधिव्याख्याता आहेत.

जे.जे. स्कुल ऑफ आर्टची एस.एफ.ए. ही पदवी संपादन केलेल्या शार्दुल कदम ह्यांचा २००८ साली जहांगीर आर्ट गॅलरीत ग्रुप शो झाला होता. याशिवाय २००९-१० साली आर्टिस्ट सेंटर मध्ये त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. तसेच अनेक प्रदर्शनात त्यांचा सातत्याने सहभाग असतो. जळगांव, सोलापूर इत्यादी ठिकाणी त्यांनी पोर्ट्रेटची अनेक प्रात्यक्षिकं केली आहेत. त्यांची अनेक चित्रे देशात तसेच परदेशातही महत्वाच्या ठिकाणी संग्रहित केली गेली आहेत. प्रथम कॅमलिनतर्फे त्यांना परदेशात जाण्यास मिळालं.

ठाण्याचे महत्वाचे युवा कलाकार म्हणून कार्यरत असणारे शार्दुल कदम ह्यांनी अनेक चित्रांच्या स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. ठाण्यातील अनेक कलेच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असतात.

त्यांना आतापर्यंत अनेक लॅंडस्केप कॉम्पिटिशनमध्ये पारितोषिकं मिळाली आहेत. २००७ साली भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या “फर्स्ट क्लास फर्स्ट यंग स्कॉलरशिप” या शिष्यवृत्तीचे ते मानकरी ठरले. २०१० साली नागपुरच्या साऊथ सेंट्रल झोन अॅवॉर्ड, २००८ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, २००५ चा कॅमलीन नॅशनल अॅवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत.

<!– – चित्रकार

पत्ता : सी. वन्. १२/७ श्रीरंग सोसायटी, ठाणे ४००६०१

कार्यक्षेत्र : फाइन आर्टिस्ट, व्यावसायिक चित्रकार, आधिव्याख्याता सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई.

दूरध्वनी : २२५३९८३१ – भ्रमणध्वनी : ९८६९३८९७६

ई-मेल : kadamshardul@yahoo.com
–>

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*