महाराष्ट्रातील आघाडीच्या “स्त्री पत्रकार” आणि “स्त्री विषयक लेखन” करणार्या शीतल करदेकर यांनी वार्ताहार, वृत्तमानस अशा वृत्तपत्रांमधून राजकीय चित्रपट तसंच नाटकांशी संबंधित सातत्याने लेख तसंच बातमीदारी केली आहे. वार्ताहर या वृत्तपत्रात गेली १० वर्षे “सखी” हा कॉलम त्या चालवत तर “वृत्तमानस” मध्ये “रंगायतन” व “प्रतिबिंब” हे साप्ताहिक सदर त्या चालवत; या बरोबरच दामिनी या दिवाळी अंकाच्या गेल्या १२ वर्षांपासून संपादक म्हनून त्या काम पाहताहेत. याशिवाय ज्येष्ठ नाट्यकर्मी कै. गोपीनाथ सावकार यांच्या चरित्रावर आधारीत पुस्तकांचं लेखन शीतल करदेकर यांनी केलं आहे.
सामाजिक क्षेत्रासाठी शीतल करदेकर यांचं योगदान भलं मोठं असून “कोंकण मराठी साहित्य परिषद-मुंबई” च्या त्यांनी सचिव म्हणून काम पाहिलं आहे, “दादर सार्वजनिक वाचनालयच्या” सांस्कृतिक सचिव म्हणून पदभार सांभाळला असून, “भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या” त्या सचिव ही आहेत.
अनेक सांस्कृतिक व मनोरंजन क्षेत्रातील विविध पुरस्कार सोहळ्यांच्या महत्वाच्या पदांवर त्या सध्या कार्यरत असून, मुंबई विद्यापीठात मराठी विषयाच्या व “पत्रकारिता आणि जनसंपर्क” या विषयांसाठी शीतल करदेकर अनेक वर्षांपासून अध्यापन करत असून, आत्तापर्यंत त्यांनी पत्रकारिता व सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे.
Leave a Reply