कारळे, शिरीष

कारळे, शिरीष

२७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांची छायाचित्रण क्षेत्रातील हुकुमत सांगून जातो. जे.जे. कलामहाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते आणि गेली २७ वर्षांत त्यांनी काळाप्रमाणेच पुढे पुढे जात आपला छायाचित्रण क्षेत्रातला आलेख उंचावला आहे. त्यांचं नाव शिरीष कारळे!

शिरीष यांना लहानपणापासूनच कॅमेर्‍याविषयी आकर्षण होतं. त्यानंतर त्यांनी जे.जे. महाविद्यालयातून छायाचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून त्यांना आव्हानात्मक प्रोजेक्ट स्वीकारायची सवय लागली आणि त्यातही ते यशस्वी झाले. त्याच बरोबर त्यांना ज्येष्ठ छायाचित्रकार विलास भेंडे आणि गौतम राजाध्यक्ष यांचेही मार्गदर्शन मिळाले. तीन दोन वर्षं त्यांच्या सबंध छायाचित्रणावर प्रभाव ठेऊन आहेत. भारतातील सर्वांत पहिलं छायाचित्रणावरचं नियतकालिक “एशियन फोटोग्राफी” (१९८५) सुरु करण्यात शिरीष यांचं महत्वाचं योगदान होतं. त्यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांनी ओबेरॉय, ताजसारख्या पंचतारांकित हॉटेल्सचा रचनात्मक प्रकल्प; तसेच “तसवीर”, “ऐतबार”, “ड्रेसिंगरुम” सारख्या चित्रपटांसाठी छायांकन केले आहे. तसेच २०१० आणि २०११ च्या काळाघोडा समारोहात छायाचित्रणावर कार्यशाळा घेण्यासाठीही त्यांना बोलवण्यात आले होते.

2 Comments on कारळे, शिरीष

Leave a Reply

Your email address will not be published.


*