तनपुरे, विजय (शिवशाहीर)

Tanpure, Vijay (Shivshahir)

विजय तनपुरे हे नगर जिल्ह्यातील राहुरीत राहणारे अपंग कलावंत. आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यानी अनेक कार्यक्रम केले आहेत. अपंगत्वावर मात करीत ते जिद्दीने, चिकाटीने शाहीर झाले. त्यांच्या पोवाड्यांच्या अनेक कॅसेट आज बाजारात उपलब्ध आहेत.

शाहीर म्हणून यश मिळवल्यावर एकदा त्यांना कीर्तन करण्याचा आग्रह झाला. पण ती आपली पात्रता नाही म्हणून त्यांनी तेव्हा नम्र नकार दिला. पण त्यानंतर स्वस्थ न बसता त्यांनी ही किर्तन करण्यासाठी कला अवगत करण्याचा ध्यास घेतला. यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यसंचालनालय, मुंबई यांच्याकडे प्रशिक्षणासाठी अर्ज केला. डिकसळच्या प्रकाश महाराज बोधले यांच्याकडे त्यांना प्रवेश मिळाला. तिथे आपण शाहीर आहोत, नामवंत शाहीर आहोत हे न सांगता त्यांनी अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे राहून कष्टाने कीर्तनाची कला सादर केली. लवकरच त्यांना कीर्तन कलेत पारंगत असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. कीर्तनाचे कार्यक्रम मिळू लागले.
तनपुरे हे जिद्दिने, मेहनत करुन शाहीराचे कीर्तनकार झाले.

विजय तनपुरे यांची www.shivgarjana.com ही वेबसाईट आहे.

संपर्कासाठी पत्ता:

शिवशाहिर विजय तनपुरे,
खळवाडी न. २, स्टेशन रोड,
ता. राहुरी, जि. अहमनगर,
फोनः ०२४२६-२३३७७९
मोबाईलः ९३२५१४१८८२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*