मौज या मराठीमधील सर्वात जुन्या व उल्लेखनीय प्रकाशन संस्थेचे साक्षेपी संपादक व प्रकाशक राहिलेल्या श्री. पु. भागवत यांचा जन्म २७ जानेवारी १९२३ रोजी झाला .
मुंबई विद्यापीठातून एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९५० ते २००७ या काळात मौज या संस्थेला स्वतःची प्रेस व फाउंड्री मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयामधून ही संस्था कार्यरत असत. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या.
मौज प्रकाशनच्या मौज (साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक अशी त्यांची ख्याती झाली. प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती अश्या माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी पार पडलेल्या तिसर्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष पद भागवत यांनी भुषविले होते.
२१ ऑगष्ट २००७ या दिवशी श्री. पु. भागवत यांचे निधन झाले.
भागवत यांच्या स्मत़ीप्रित्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेला श्री.पु. भागवत पुरस्कारने सन्मानित करते. आजपर्यंत औरंगाबाद येथील ‘साकेत’ प्रकाशन, मौज प्रकाशनच्या संजय भागवत व मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
प्रकाशक श्री पु भागवत (27-Dec-2021)
पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत (27-Dec-2018)
Leave a Reply