जन्म: सप्टेंबर ९, १९५० (मुंबई)
श्रीधर फडके हे ख्यातनाम मराठी संगीतकार आणि गायक असुन, ख्यातनाम गायक व संगीतकार स्व. सुधीर फडके आणि ख्यातनाम गायिका स्व. ललिता फडके यांचे ते सुपुत्र.
श्रीधर फडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. लक्ष्मीची पाउले, ह्रदयस्पर्शी, घराबाहेर हे काही गाजलेले चित्रपट.
त्यांनी काही म्युझिक आल्बमही केले आहेत. ऋतु हिरवा, काही बोलायाचे आहे, फिटे अंधाराचे जाळे हे त्यांचे काही गाजलेले भावगीत संग्रह.
श्रीधर फडके यांना फिल्मफेअर पुरस्काराने (Filmfare Award) तीन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. १९९४ मध्ये वारसा लक्ष्मीचा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत, १९९६ मध्ये पुत्रवती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत आणि २००० मध्ये लेकरू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत. त्याचबरोबर त्यांना वसुंधरा पंडित पुरस्काराने २००८ मध्ये गौरविण्यात आले आहे.
ते एयर इंडिया या भारत सरकारच्या उपक्रमामध्ये मोठ्या हुद्ददयावरुन सेवानिवृत्त झाले आहेत.
श्रीधर फडके यांची काही गाजलेली गाणी:
ऋतू हिरवा
फ़ुलले रे
जय शारदे वागीश्वरी
झिणीझिणी वाजे वीण
माझिया मना
भोगले जे दु:ख
घन रानी
सांज ये गोकुळी
अबोलीचे बोल
दिवे देहात स्पर्शाचे
घर असावे घरासारखे
केशी तुझिया
मनी वसे
मना घडवी संस्कार
पहिल्याच सरीचा
वारा लबाड आहे
काही बोलायाचे आहे
नख लागल्याशिवाय
अवेळीच केव्हा दाटला अंधार
तुला पाहिले मी
झुळूक आणखी एक
एक वेस ओलांडली
दोन रात्रीतील आता
तू माझ्या आयुष्याची पहाट
तेजोमय नादब्रम्ह
मी एक तुला फ़ूल दिले
रोज तुझ्या डोळ्यात
तुला पाहिले मी
एका गोरज घडीला
कधी रिमझिम
मी राधिका
हे गगना
कलिका कशा गं बाई फ़ुलल्या
क्षितिजी आले भरते गं
जळण्याचे बळ तूच दिले रे
गो माझे बाय
होऊनी मी जवळ येते
माझी कहाणी
रंग किरमिजी
फ़िटे अंधाराचे जाळे
माझ्या मातीचे गायन
भरुन भरुन आभाळ आलंय
त्या कोवळ्या फ़ुलांचा
मन मनास उमगत नाही
ॐकार स्वरूपा
जाणीव नेणीव भगवंती नाही
रुपे सुंदर सावळा गे माये
गुरू परमात्मा परमेशु
विठ्ठल आवडी प्रेमभावो
येथोनी आनंदु रे
माझ्या मना लागो छंद
देवाचिये द्वारी
तल्लीन गोविंदे
त्रिभंगी देहुडा
कोमल वाचा दे रे राम
धन्य पंढरी
आळवीन स्वरे
आम्हा नकळे
सुनीळ गगना
हेच मागणे
विठ्ठलनामाचा रे टाहो
रिमझिमल्या का धारा
सजणा पुन्हा स्मरशील ना
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
प्रज्ञावंत, प्रतिभावंत संगीतकार व गायक श्रीधर फडके (9-Sep-2016)
प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके (9-Sep-2017)
प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके (9-Sep-2018)
Leave a Reply