महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीला कलेची दीर्घ संस्कृती आहे. या संस्कृतीचे वारसदार म्हणजे पळशीकर, बहुळकर, हुसे, गायतोंडे, भास्कर कुलकर्णी यांसारखे सरस चित्रकार होय. याच चित्रकारांच्या परंपरेशी नातं सांगणारं ठाण्यातलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे चित्रकार सुधीर पटवर्धन.
१९७४ साली पटवर्धन ठाण्यात आले. इथेच त्यांना चित्रकार पळशीकर भेटले त्यांच्याकडून पटवर्धनांनी काही गोष्टी शिकल्या. परंतु पटवर्धन ह्यांना सगळे स्वयंशिक्षित चित्रकार म्हणूनच ओळखतात. त्यांच्या अनेक एकल प्रदर्शनाव्यतिरिक्त त्यांनी १९८२ ते १९८७ दरम्यान लंडन, जर्मनी, न्युयॉर्क, पॅरिस, जिनीव्हा इत्यादी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेतला. तत्कालीन ठाणे शहराचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रात दिसून येते.
Leave a Reply