गडकरी रंगायतन हे ठाण्यातील एका नव्या पर्वाची नांदीच ठरलं. कारण रंगायतन झाल्यानंतर ठाण्यातील अभिनयाला एक मंच मिळाला आणि रंगायतनच्या कट्ट्यावर नाट्यसृष्टीला योगदान देणारे कलावंत मोठे होऊ लागले. त्यातलाच एक कलाकार म्हणजे “सुनिल गोडसे”!
झी मराठीवरील “वादळवाट” या मालिकेतील “शिवराम खंडागळे” ही भूमिका वठवून सुनील गोडसे यांना जनमनात स्थान मिळालं. त्यानंतर नितीन चंद्रकांत देसाई निर्मित स्टार प्रवाहवरील “राजा शिवछत्रपती” या शिवपटातील “शाहिस्तेखानची”भूमिका साकारून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. त्यांचा हा प्रवास हौशी रंगभूमी वरुन मग पुढे दूरदर्शन मालिका, चित्रपट यांकडे असा झाला. श्री विश्वास पाटील यांनी केलेल्या “निर्भय व्हा” चित्रवाणी संचातही त्यांनी काम केले आहे.
<!–
पत्ता : बी-७०१, अनमोल, सहकार कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, नौपाडा, ठाणे (प.)
कार्यक्षेत्र : नाटक, दूरदर्शन, चित्रपट आणि जाहिरात कलाकार
भ्रमणध्वनी : ९२२३३२००९२
ई-मेल : suneel.godse@gmail.com
–>
Leave a Reply