नाडकर्णी, (डॉ.) आनंद

मन नेहमीच सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी अभ्यासाचा कुतूहलाचा विषय झालेला आहे. जगातील सर्वंत वेगवान आणि आवरायला कठीण गोष्ट कोणती; तर ते आहे आपलं मन ! पण काही व्यक्ती अशा आहेत ज्या मनावर अधिराज्य करतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी! व्यवसायानं डॉ. नाडकर्णी हे मानसोपचारतज्ञ आहेत.
[…]

तांबे, (डॉ.) अनिल भास्कर

आपलं हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असतो आणि त्याचीच आपण योग्यरितीनं काळजी घेत नाही; अशावेळी काही विपरित घडलं तर डॉ. हाच देव ठरतो!
[…]

सोमण, दा. कृ.

ठाणे शहर हे ज्याप्रमाणे संस्कृती कला, परंपरा यांचा आदर करतं त्याचप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान यांचीही कास ठाण्यानी धरली आहे. याचीच साक्ष देतात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून बिरुद मिळालेले श्री. दा.कृ. सोमण.
[…]

जोशी, (डॉ.) कल्पना संजय

गेली वीस वर्षे डॉ. कल्पना जोशी ह्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करु शकतील, अशा प्रभावी औषधांचे संशोधन कार्यकरीत आहेत. त्या सध्या गोरेगांव येथील पिरामल लाईफ सायन्सेस या भारतीय औषध संशोधन संस्थेत औषधशास्त्र विभागाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. 
[…]

रेळेकर, (डॉ.) राजन गजानन

डॉ. राजन रेळेकर यांनी १९९२ साली ठाण्यात स्वत:चा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. १९९७ साली डॉ. राजन यांनी “समर्थ नर्सिंग होम” हे स्वत:चे रुग्णालय सुरु केले. १९९२ पासून डॉ. राजन हे कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सेवा देत आहेत.
[…]

रेळेकर, (डॉ.) सुवर्णा राजन

वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करुन अनेक वर्षे ठाणेकरांच्या स्वास्थ्याची काळजी घेणार्‍या डॉ. सौ सुवर्णा रेळेकर १९९२ पासून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी व १९९७ पासून पूर्णवेळ सहयोगी प्राध्यापिका म्हणून त्या सेवेत रुजू आहेत.
[…]

नातू, (डॉ.) उल्का अजित

स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र तज्ज्ञ, योगतज्ज्ञ. मूळातच एम.डी. असलेल्या डॉ. उल्का यांनी योग शिक्षण पदविका प्राप्त करुन गेली दहा वर्षं त्या योगचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
[…]

जोशी, (डॉ.) विनायक दत्तात्रय

वैद्यक व्यवसायात न्यूरोसर्जन म्हणून ठाण्याचं नाव उभं करणारे न्यूरोसर्जन डॉ. विनायक दत्तात्रय जोशी हे ठाण्याचं भूषण! निव्वळ व्यावसायिक दृष्टीकोनातून आपल्या व्यवसायाकडे न पाहता समाजभावनेचे, सामाजिक भान ठेवून त्यांनी अनामत रक्कम न घेता पूर्ण, योग्य व आवश्यक ते आचार करायचे असे ध्येय ठेवून २००४ साली डॉ. जोशी यांनी “डिव्हाईन” हॉस्पिटलची स्थापना केली.
[…]

गडवाल, (डॉ.) व्यंकटराव

वैद्यक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ठाण्याचे मानबिंदु ठरलेले डॉ. गडवाल हे ठाण्यातलं एक यशस्वी व्यक्तिमत्व! डॉ. गडवाल यांनी “बॉटॅनिकल रॉ मटेरियल” समजल्या जाणार्‍या “सोनामल वायरम” या वृक्षाच्या जंगली प्रजातीमधून तयार होणारी “सोनालम क्रॉप” ही औषधी वनस्पती जगासमोर आणली.
[…]

मोकाशी, प्रिती प्रदीप

चीन येथे झालेल्या ज्युनिअर सर्कीट स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधीत्व करुन देणारी जागतिक क्रमवारीत भारताला ५ वे स्थान मिळवून देण्याची किमया करणारी ठाण्याची प्रिती प्रदीप मोकाशी म्हणजे ठाण्याचा गौरवच आहे.
[…]

1 9 10 11 12 13 17