डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी
आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. […]