तिरोडकर, गजानन

गजाननराव उर्फ दादासाहेब तिरोडकर, यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी या लहान व निसर्गरम्य गावात झाला. असामान्य महत्वाकांक्षा व यशाच्या आभाळाला सहज गवसणी घालू शकणारी प्रखर बुध्दिमत्ता यांचा उत्तम संगम त्यांच्या ठायी झाला असल्या कारणाने त्यांचा ओढा हा कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा, स्वतःचा एखादा व्यवसाय थाटून त्यात इतरांपेक्षा काही भव्य दिव्य करून दाखविण्याकडे जास्त होता. उद्योगविश्वात पाय रोवण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द व मानसिक तयारी अंगी बाणविल्यानंतर त्यांनी ग्लोबल समुहाची बीजे पेरली. त्या काळात भांडवलाची फारसी उपलब्धता नसतानाही विश्वासु व होतकरू मनुष्यबळाच्या जोरावर त्यांनी उद्योगाचा श्रीगणेशा केला.
[…]