कर्नाटकी, विनायक दामोदर (मास्टर विनायक)
एखादा जन्मजात, अस्सल कलावंत जन्माला येतो आणि आपल्या प्रतिभेने, बुद्धिने आपण वावरत असलेले क्षेत्र समृद्ध करून उंचीवर नेऊन ठेवतो, ज्याचा आनंद त्या कलाकारालाही होतो आणि रसिकांनाही होतो. अशाच जातकुळीचा चित्रपटसृष्टीतला एक श्रेष्ठ कलावंत म्हणजे मास्टर विनायक. मास्टर विनायकांचा जन्म १९ जानेवारी १९०६ ला कोल्हापूर येथे झाला. […]