रामदास पाध्ये

रामदास पाध्ये हे भारतामध्ये तसेच परदेशामध्येही या कलेमुळे नावाजले गेलेले हाडाचे कलाकार आहेत. त्यांनी बनविलेले व जीवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. टेलिव्हीजन मालिका, जहिराती, सिनेमे यांच्यातून सुध्दा ते आपल्या मनोरंजनासाठी भेटीस आले आहेत. आपल्या बाहुल्यांच्या कार्यक्रमांमधून बालविवाह, बालशिक्षण, ड्रग्स ची समस्या, जागतिक तापमानवाढ अशा महत्वाच्या मुद्दांवर ते नेहमीच भाष्य करतात. त्यांच्या जादुई बोटांचा स्पर्श झाला की त्या निर्जिव जीवांना नवं जीवनं मिळतं, ते रसिक जनांशी संवाद साधतात, त्यांना कधी हसवतात, रिझवतात, हास्याच्या कल्लोळामध्येही त्यांच्या जाणीवांचे पडदे खुले करून जातात. त्यांना प्रेम शिकव तात, संवेदनशिलतेचा मुलामा लावतात. मग तो लिज्ज्त पापड जहिरातीमधला बनी असो किंवा ‘दिल हे तुम्हारा’ मधील सर्वांना हवाहवासा वाटणारा बाहुला असो अशा निरनिराळ्या बाहुल्यांद्वारे रामदास पाध्ये प्रत्येक प्रयोगाला एखाद्या नवीन विचारांची, व कल्पनांची कुपी प्रेक्षकांसमोर उघडत असतात.
[…]