आनंद मोडक
आपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक यांनी आपल्या गावालाच शाळेत शिक्षण घेतले. तेथेच त्यांनी संगीताचे धडे गिरवले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट निवडली. पीडीएच्या घाशिराम कोतवालमधून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सतीश आळेकरांच्या “महानिर्वाण” या नाटकाने त्यांना संगीतकार चख्याती मिळवन दिली.
[…]