कुलकर्णी, धोंडूताई

धोंडुताईंनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीताचे शिक्षण सुरू केले होते.शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गायनकला सादर करण्याची संधी मिळाली.
[…]

गायतोंडे, सुरेश भास्कर

अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करुन गेली ५५ ते ६० वर्षे अविरत तबलावादन करुन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तबलावादकांमध्ये ज्येष्ठ म्हणून आदराने ओळखले जाणारे ठाणेकर सुरेश तथा भाई गायतोंडे हे ठाण्यातील एक कलारत्न होय.
[…]

पणशीकर, प्रभाकर

मराठी नाट्यसृष्टीतील एक अत्यंत वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रभाकर पणशीकर. नाट्य वर्तुळात प्रभाकर पणशीकरांना “पंत या नावाने ओळखले जात असे. त्यांनी `नाट्यसंपदा’ या त्यांच्या नाट्यनिर्मितीसंस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी मराठी रसिकांना दिली. […]