अरूण दाते

लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गाणारे अरूण दाते हे मराठीतील बहुधा एकमेव गायक असावेत. यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरूण दाते या त्रिकुटाने मराठी भावगीताला पुन्हा एकवार झळाळी प्राप्त करून दिली. श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अरूण दाते यांच्या आवाजावर स्वत:च्या रचना चढवण्याचा मोह आवरता आला नाही. […]

अनंत माने

वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या “सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. […]

अजय सरपोतदार

टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी सरपोतदार यांनी अनेक जाहिराती आणि माहितीपट (डॉक्युयमेंटरी) तयार केले. अजय सरपोतदार यांनी आपल्या विविधांगी कारकिर्दीत हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीत अनेक वर्ष वरिष्ठ निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली. मराठीबरोबरच प्रादेशिक […]

अच्युत केशव अभ्यंकर

अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले.
[…]

किशोर कदम उर्फ कवी सौमित्र

काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले […]

राम नाईक

राम नाईक हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांचा जन्म १६ एप्रिल १९३४ रोजी झाला. राम नाईक यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले. ते […]

साटम, शिवाजी

शिवाजी साटम हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाट्यक्षेत्रातील आघाडीचे अभिनेते आहेत. सी आय डी या हिंदी मालिकेमुळे ते गेली अनेक वर्षे अक्षरशः घराघरात पोहोचले आहेत.

नाईक, गुरुनाथ विष्णू

मराठीतील सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक. बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही शेकडो रहस्यमय कादंबऱ्या लिहील्या.  त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी संपूर्ण पिढीला वेड लावले होते. दर महिन्याला ते सरासरी शंभर पानांच्या ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत. १९७० ते १९८२ या […]

श्रीकांत ठाकरे

श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते. संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले. […]

1 11 12 13 14 15 79