मांद्रेकर, श्रद्धा

व्हि.पी.एम. महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या श्रद्धाचं शालेय शिक्षण ठाण्यातील होली क्रॉस शाळेतून झालं. श्री प्रताप चव्हाण आणि त्यानंतर श्री. नाईक यांच्याकडून अॅथलेटिक्सचं प्रशिक्षण घेतलेल्या श्रद्धा मांद्रेकरांनी महाराष्ट्र रज्याच्या संघाचं १९८१ ते १९८६ अशी सलग पाच वर्षं कर्णधार पद भूषविलं.
[…]

परब, जनार्दन

मराठी रंगभूमी, चित्रपट, तसंच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अविष्कार दाखविणार्‍यांपैकी एक नाव म्हणजे जनार्दन परब.अनेक हिंदी-मराठी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत यामध्ये “माझा पती करोडपती”, “नवरी मिळे नवर्‍याला”, “गम्मत जम्मत”, “कुलस्वामिनी तुळजाभवानी” चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत “कसम”, “शिकारी”, “ऐलान”, “जिद्दी”, “क्रांतीवीर”, “बाजीगर”, “नायक”, “गुलाम”, “उडान”, “चाय ना गेट” सारख्या असंख्य चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
[…]

माळी, जगदीश

अनेक कलाकारांना आपल्या कॅमेर्‍याद्वारे ग्लॅमर प्राप्त करून देणारे ज्येष्ठ सिनेछायाचित्रकार जगदीश माळी यांनी एका चित्रपटविषयक मासिकापासूनक आपल्या फोटोग्राफीच्या कारकीर्दीला सुरवात केली.अभिनेत्री रेखाचे ते आवडते फोटोग्राफर होते. व त्या केव्हाही आणि कधीपण जगदीश माळी यांच्याकडूनच फोटो काढून घेत असे.जगदीश माळींनी अनेक जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओसाठी काम केले होते.
[…]

काळे, वसंत पुरुषोत्तम (व.पु. काळे)

लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे,हे पेशाने वास्तुविशारद होते.
“आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत.
[…]

पटवर्धन, राम

साक्षेपी संपादक आणि अनुवादक म्हणून ख्याती असलेल्या राम पटवर्धन यांचा जन्म २१ मार्च १९२८ रोजी रत्नागिरीतील गणेशगुळे गावात झाला.महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी अनुवाद करायला सुरुवात केली.१९४९ मध्ये ते “मौज” साप्ताहिकात काम करू लागले तसंच मुंबईतल्या काही महाविद्यालयांत काही काळ अध्यापन देखील केलं .त्यांनी “नाइन फिफ्टी टू फ्रिडम” या पुस्तकाचा “अखेरचा रामराम” या नावाने मराठी अनुवाद केला. तसेच बी. के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक “योगदीपिका” नावाने मराठी साहित्यात आणले.
[…]

कुलकर्णी, धोंडूताई

धोंडुताईंनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीताचे शिक्षण सुरू केले होते.शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गायनकला सादर करण्याची संधी मिळाली.
[…]

विक्रम सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे व त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र असलेल्या विक्रम सावरकर यांनी जाज्वल्य
देशभक्तीचे व्रत स्वीकारत हिंदुमहासभेसाठी कार्य केले.
[…]

वत्सला देशमुख

वत्सला देशमुख या मराठी रंगभूमी तसंच चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी-मराठी चित्रपटांमधुन विविधांगी व चारित्र्य संपन्न अभिनेत्री तसंच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. […]

गोडबोले, वरदा संदेश

ठाणे शहर म्हणजे संगीतरत्नांची खाणच आहे. संगीतभूषण राम मराठे यांसारखे ज्येष्ठ गायक याच ठाण्यातले. त्यांच्या पासून सुरु झालेली ही परंपरा आज अभिमान वाटावी इतकी उच्च दर्जाची झाली आहे. […]

प्रधान, रोहित अरविंद

साऊंड रेकॉर्डिंग व मिक्सिंग मध्ये ७ वर्षांचा अनुभव, चित्रपट, सिरियल्स आणि म्युझिक अल्बमचे काम केले आहे. म्युझिक प्रॉडक्शन मध्ये इंग्लंड मध्ये जाऊन मास्टर्स डिग्री मिळवली.
[…]

1 29 30 31 32 33 79