जोशी, विजय सखाराम
गेली ३० वर्षं ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र “दै. सन्मित्र” चा कारभार पाहणारे विजय जोशी यांनी ७ वर्षं ठाणे सन्मित्र हे व्हिडिओ वार्तापत्रही चालवलं. तसंच “ठाणे समाचार” हे इंग्रजी वृत्तपत्र देखील १ वर्ष चालवलं.
[…]
गेली ३० वर्षं ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र “दै. सन्मित्र” चा कारभार पाहणारे विजय जोशी यांनी ७ वर्षं ठाणे सन्मित्र हे व्हिडिओ वार्तापत्रही चालवलं. तसंच “ठाणे समाचार” हे इंग्रजी वृत्तपत्र देखील १ वर्ष चालवलं.
[…]
उत्तम बाळू भिकले हे २००२ साली मराठा लाईट इनफंन्ट्री कोल्हापूरमधून सैन्य दलात भरती झाले होते. गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे हे उत्तम भिकले यांचं मूळ जन्मगाव .बेळगाव येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर भिकले जम्मू येथे रूजू झाले. उत्तम भिकलेंचे प्राथमिक शिक्षण हडलगे येथे गावातील शाळेत, तर माध्यमिक शिक्षण एस. एस. हायस्कूल नेसरी येथे झाले.
[…]
आपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणारे गजानन वाटवे. […]
दहा वर्षं छायाचित्र पत्रकार म्हणून कार्यरत असलेले आनंद शिंदे यांनी विधी क्षेत्रात पदवी मिळवली आहे. आपल्या छायाचित्रणाच्या छंदाला व्यवसायात बदलून त्यांनी आजवर हिंदुस्तान टाईम्स, महाराष्ट्र टाईम्स, डी.एन.ए., दैनिक भास्कर या वृत्तपत्रांसाठी आणि चित्रलेखा आणि यू.एस.पी. एज या मासिकांसाठी छायाचित्रण केलं आहे.
[…]
४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव अणि खर्या अर्थाने जगरहाटी करुन निष्ठेने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे पक्के ठाणेकर. आठ वर्षं “महाराष्ट्र टाईम्स”, त्यानंतरची सात वर्षे “लोकसत्ता”, नंतर `लोकमत’ आणि शेवटी `दिव्य मराठी’ या मराठी दैनिकांचे मुख्य संपादकपद त्यांनी भूषविले आहे. […]
ठाण्यातील पत्रकार परंपरेतील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे तीस वर्षं पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ. १८ वर्षं टाईम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ सध्या “ठाणे वैभव” या वृत्तपत्राचे संपादक आहेत.
[…]
गेली सुमारे २७-२८ वर्षे प्रवीण देशपांडे छाछायाचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छायाचित्रकला हे साध्य नव्हे तर साधन समजून विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी निगडीत आहेत.
[…]
२७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांची छायाचित्रण क्षेत्रातील हुकुमत सांगून जातो. जे.जे. कलामहाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते आणि गेली २७ वर्षांत त्यांनी काळाप्रमाणेच पुढे पुढे जात आपला छायाचित्रण क्षेत्रातला आलेख उंचावला आहे. त्यांचं नाव शिरीष कारळे!
[…]
लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू यांचा जन्म १६ मे १९३३ या दिवशी झाला होता. लहू खाडेंनी मराठी तमाशा कलावंत, अभिनेते म्हणून आपली छाप रसिक मनांवर उमटवलीच! पण ते स्वत:तमाशा फडाचे मालक होते. घरात तीन पिढ्यांची तमाशा परंपरा होती व तीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली. दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रा-जत्रांमधून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे.
[…]
अभिनेते यशवंत दत्त यांना खर्या अर्थाने नाव मिळवून दिले ते “नाथ हा माझा” या नाटकाने! या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका अप्रतिमरित्या रंगवला की प्रेक्षकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions