वाड, श्रीकांत

मुंबई विद्यापीठातून बी.फार्म, एल.एल.बी. पदव्या मिळवलेले श्रीकांत वाड यांनी अतिशय विरोधाभासी क्षेत्रात आपलं नाव मिळवून ठाण्याला मोठं केलं आहे. एका बाजूला बी.फार्म आणि एल.एल.बी. तर दुसरीकडे बॅडमिंटन या दोन टोकांच्या क्षेत्रात श्रीकांत वाड यांनी आपली छाप सोडली आहे.
[…]

विद्वांस, श्रिया नितीन

ठाण्यातील युवा धावपटू म्हणून जिनं आपली ओळख प्राप्त केली आणि ठाण्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उच्च केलं ती म्हणजे श्रिया विद्वांस!
[…]

टिपणीस, यतिन

यतिन टिपणीस गेली २३ वर्षांपासून ठाणे जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यभाग सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे १२ वर्षांपासून महाराष्ट्र टेबलटेनिस असोसिएशनचे सह-सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. भारतीय टेबलटेनिस फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य आहेत.
[…]

पुजारे, दामोदर गणेश

लाकडासारख्या कठीण वस्तूमध्ये इतकी जिवंत जादू असावी हा एक चमत्कारच! हा चमत्कार प्रत्यक्ष उतरवणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध कलावंत म्हणजे दामोदर गणेश पुजारे. पुजारे ह्यांचा जन्म ११ जुलै १९३४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वालावलचा. पुढे त्यांनी उच्च कलाशिक्षणासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि १९६२ साली ते आर्ट मास्टर झाले.
[…]

कदम, ज्योत्स्ना संभाजी

चित्रकार ज्योत्स्ना संभाजी कदम या ठाण्याच्या चित्रकला क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. व्यावसायिक चित्रकार व लेखिका म्हणून प्रसिद्ध असणार्‍या ज्योत्स्ना कदम या गेली ३० वर्षे सातत्याने पेंटींग करत आहेत. एक दर्जेदार, सर्जनशील, मनस्वी चित्रकार म्हणून त्यांची कलाक्षेत्रात ख्याती आहे.
[…]

पालांडे, मिनल संजय

लहानपणापासूनच कबड्डीची आवड असणार्‍या सौ. मिनल संजय पालांडे यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच कबड्डीसाठी झोकून दिलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला कबड्डी संघात त्यांनी सहा वर्षं महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आणि एक वर्ष कर्णधार म्हणूनही त्यांनी संघाचं नेतृत्व केलं.
[…]

केतकर, मुग्धा दिनेश

रिदमिक जिमनॅस्टिक या खेळात सहसा कुणी रस घेत नाहीत. परंतु ठाण्यातील मुग्धा केतकर हिने मात्र शालेय जीवनातच आपला मार्ग निश्चित केला आणि वयाच्या ९ व्या वर्षापासून राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत पदक मिळवायला सुरुवात केली.
[…]

सहस्त्रबुद्धे, पूजा विजय

वयाच्या ९ व्या वर्षांपासूनच तिनं बुस्टर क्लब इथे सौ. शैलजा गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली टेबलटेनिसचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. २००१ पासून २०११ पर्यंत राज्यस्तरावर ठाण्याचे प्रतिनिधीत्व करुन वैयक्तिक ६ सुवर्णपदकांसह; सांधिक १० सुवर्ण, १ रौप्यपदक तिने पटकावलं आहे.
[…]

टिपाले, प्राजक्ता कैलास

वयाच्या ११ व्या वर्षापासून प्राजक्ताने खेळायला सुरुवात केली आणि १२ व्या वर्षी पहिले राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले, १७ व्या वर्षी राष्ट्रस्तरीय स्पर्धा जिंकली.
[…]

नकवी, इशान

सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरास क्रीडापटूंची नगरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन ह्या क्रीडाप्रकारात यश प्राप्त करुन इशान नकवी ह्याने ठाण्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला.
[…]

1 39 40 41 42 43 79