मोकाशी, प्रिती प्रदीप
चीन येथे झालेल्या ज्युनिअर सर्कीट स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधीत्व करुन देणारी जागतिक क्रमवारीत भारताला ५ वे स्थान मिळवून देण्याची किमया करणारी ठाण्याची प्रिती प्रदीप मोकाशी म्हणजे ठाण्याचा गौरवच आहे.
[…]
चीन येथे झालेल्या ज्युनिअर सर्कीट स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधीत्व करुन देणारी जागतिक क्रमवारीत भारताला ५ वे स्थान मिळवून देण्याची किमया करणारी ठाण्याची प्रिती प्रदीप मोकाशी म्हणजे ठाण्याचा गौरवच आहे.
[…]
मैदानी आणि मर्दानी हे दोन शब्द महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजले आहेत. त्यामुळे मराठी माणूस एकतर मैदानात मर्दूमकी गाजवतो नाहीतर मर्दानी छातीनं मैदान मारतो. असंच ठाण्यातलं एक व्यक्तीमत्व म्हणजे ४० वर्षं मैदानी खेळाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दत्ता चव्हाण होय. […]
एक व्यावसायिक चित्रकार, लेखक व वक्ता अशी विजयराज मुरलीधर बोधनकार ह्यांची ओळख करुन देता येईल. जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतल्यावर लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ ह्या वृत्तपत्रांमधून लेखन व चित्रकारीता केली.
[…]
ठाणे स्कुल ऑफ आर्टच्या प्राचार्य, चित्रकार व नृत्यांगना निलिमा भालचंद्र कढे म्हणजे ठाणे शहराला अभिमान असणारे कलाकार व्यक्तिमत्व त्यांनी सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून कलाक्षेत्रातील शिक्षण घेतलं. कला, वाणिज्य, विज्ञान, मेडिकल, इंजिनियरिंग, एम.बी.ए. इत्यादी सर्व शिक्षण शाखांची सोय उपलब्ध असलेल्या ठाणे शहरात चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्याची मात्र सोय नव्हती.
[…]
मूळच्या बंगालच्या असणार्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म, आजच्या बांगलादेशाची राजधानी ढाक्का येथे २८ जानेवारी १९३७ साली झाला. सुमन हेमाडी हे त्यांचे माहेरचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबध्द झाल्यावर त्या मुंबईत आल्या. दहा वर्ष वेगवेग़ळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतांनाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही सुमन कल्याणपुर यांना मिळत गेली.
[…]
रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या वासुदेव बळवंत फडक्यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले होते. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्यात वास्तव्यास आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.
[…]
मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे. […]
दशरथ पुजारी यांनी आपल्या संगीतिक कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, कवि सुधांशु, योगेश्वर अभ्यंकर, मधुकर जोशी अश्या नामवंत गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. यापैकी काही लोकप्रिय ठरलेली गाणी म्हणजे ‘झिमझिम झरती श्रावणधारा’,’अशीच अमुची आई असती’,’देव माझा विठू सावळा’,’केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’,’नकळत सारे घडले’,’मुरलीधर घनश्याम’,’मृदुल करांनी छेडित तारा’,’सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’.
[…]
मराठी नाट्यसृष्टीतील एक अत्यंत वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रभाकर पणशीकर. नाट्य वर्तुळात प्रभाकर पणशीकरांना “पंत या नावाने ओळखले जात असे. त्यांनी `नाट्यसंपदा’ या त्यांच्या नाट्यनिर्मितीसंस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी मराठी रसिकांना दिली. […]
हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील विख्यात संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक असलेल्या सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions