प्रदीप निफाडकर

‘द हिंदू’ या निष्पक्ष दैनिकाने ज्यांचा उल्लेख ‘गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार,’ असा केला, झी चोवीस तास या वाहिनीचे व झी मराठी दिशा या आठवडापत्राचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर ज्यांना ‘भट यांचे अंतरंग शिष्य’ म्हणाले, ते गझलकार प्रदीप निफाडकर. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता- स्वप्नमेणा. ज्याची आता तिसरी आवृत्ती संपली आहे. त्यांनी ‘गझल’ या काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव ‘गझलदीप’ आहे. त्याचीही पहिली आवृत्ती संपली आहे. […]

प्रदीप कबरे

कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे. […]

कवी प्रदीप

भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. […]

प्रतिभाताई पवार

शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’ […]

प्रकाश बाळ जोशी

प्रकाश बाळ जोशी हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. एका बाजूला सर्जनशील लेखन तर दुस-या बाजूला एक चित्रकार म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख याची त्यांनी स्वत:ची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे. […]

प्रकाश घांग्रेकर

प्रकाश घांग्रेकर मुळचे पुण्याचे.संगीत नाटकाची कारकीर्द घडवण्यासाठी १९६० साली मुंबईला आले. देवियाच्या द्वारी या नाटकातून त्यांची कारकीर्दची सुरवात झाली. […]

पुष्पा पागधरे

त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या. […]

पुरुषोत्तम श्रीपत काळे

पुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे. […]

पुरुषोत्तम भास्कर भावे

६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले. […]

पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक

पु.ना.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती. […]

1 14 15 16 17 18 80