पं.सत्यशील देशपांडे

तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य. कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. […]

पं.जगन्नाथबुवा पुरोहित

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे उस्ताद विलायत हुसेन खान हे यांचे गुरू.  पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या शिष्यांच्या मध्ये राम मराठे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, जितेन्द्र अभिषेकी, सी.आर्.व्यास, यशवंतबुवा जोशी, वसंतराव कुलकर्णी, लीलाताई करंबेळकर, मनोरमा वागळे, मोहनतारा अजिंक्य, जी.एन्.जोशी, मन्ना डे, आणि तबल्यातील भाई गायतोंडे, नाना मुळे! अशी अनेक दिग्गजाची नावे होती. […]

पं. शैलेश भागवत

शैलेश भागवत यांचे आकाशवाणी वरून अनेक वेळा सनई वादनाचे कार्यक्रम झाले आहे. त्यांनी भारताबरोबरच दुबई,अमेरिका, युरोप आणि श्रीलंका येथे ही अनेक कार्यकम केले आहेत. शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे. […]

पं. विजय कोपरकर

त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात. […]

पं. वामनराव सडोलीकर

खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं. […]

पं. राम मराठे

रामभाऊंनी त्यांच्या संगीत कारकीर्दीत अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य विद्यादानाचे कार्य केले (१९६५-८९). त्यांच्या शिष्यवर्गात उल्हास कशाळकर, विश्वनाथ बागुल, योगिनी जोगळेकर, मधुवंती दांडेकर रामप्रथम, राम नेने, सुधीर देवधर, निवृत्ती चौधरी, योगिनी जोगळेकर, शशी ओक, सुरेश डेग्वेकर, प्रदीप नाटेकर, सुधीर दातार, राजेंद्र मणेरीकर इत्यादींचा समावेश होतो. […]

पं. मुकुंदराज गोडबोले

नुकताच संत सोपानदेवांच्या अभंगांचा त्यांनी संगीतबद्ध केलेला कार्यक्रम स्मरणीय होता. त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता. […]

पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर

१९५९ पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले. १९६०च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली. […]

पं. मधुकर दीक्षित

पं. दीक्षित बरीच वर्षे खाँसाहेबांच्या सान्निध्यात राहिल्याने खाँसाहेबांच्या सतार वादनातील गायकी अंग व त्यामधील बरेच बारकावे ज्ञात झाल्याने ते त्यांनी बऱ्यापैकी आत्मसात केले होते. त्यामुळे दीक्षित यांच्या सतार वादनात खाँसाहेबांचा पगडा भासत असे. […]

पं. नारायणराव बोडस

त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या. […]

1 17 18 19 20 21 80